Home/स्पर्धा

स्पर्धा निकाल

BMM 2026 Competition Results

BMM 2026 Seattle

Competition Results

Explore the winners across the exciting competitions of BMM 2026 Seattle...

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सर्व विजेते, सहभागी कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी यांचे मनःपूर्वक कौतुक. आपल्या कलाविष्काराने हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला.

तालश्रेष्ठ वादनोत्सव - ढोल ताशा स्पर्धा

Jury Panel

परीक्षक

हृषिकेश रानडे

प्रथम

स्वराज्य ढोल पथक

युटा

द्वितीय

फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक

तृतीय

नादताल

अटलांटा

Event Photo Gallery

स्वराज्य ढोल पथक, युटा — प्रथम क्रमांक

स्वराज्य ढोल पथक, युटा — प्रथम क्रमांक

फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक — द्वितीय क्रमांक

फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक — द्वितीय क्रमांक

नादताल, अटलांटा — तृतीय क्रमांक

नादताल, अटलांटा — तृतीय क्रमांक

परीक्षक हृषिकेश रानडे यांच्या समवेत स्पर्धा आयोजक — अध्यक्ष विनय क्षीरसागर; उपाध्यक्ष निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये

परीक्षक हृषिकेश रानडे यांच्या समवेत स्पर्धा आयोजक — अध्यक्ष विनय क्षीरसागर; उपाध्यक्ष निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये

🌟 प्रमुख नोंदी:

६० वादकांनी ८-९ मिनिटांच्या हाय-एनर्जी सादरीकरणाने मुख्य रंगमंच हादरवून सोडला!

दुसऱ्या दिवशीचा मेगा-जॅम: तिन्ही पथकांनी सिॲटल ढोल ताशा पथकासोबत कोणतीही पूर्वतयारी नसताना एका छोट्या सूचनेवर अप्रतिम आणि उत्स्फूर्त 'जॅमिंग' सादर केले. हे ढोल ताशा कौशल्याचे, एकता आणि पराकोटीच्या निष्ठेचे सादरीकरण होते.

प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. विजय केंकरे यांच्या हस्ते सर्व संघांना ट्रॉफी आणि वैयक्तिक प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

ढोल ताशा समितीचा अध्यक्ष म्हणून निरोप घेताना, मी अत्यंत अभिमानाने जाहीर करतो की 'ताल श्रेष्ठ वादनोत्सव' प्रचंड यशस्वी झाला आणि आमच्या स्वप्नाची सुंदर पूर्तता झाली! ढोल ताशा या कलेला अव्वल दर्जाच्या निर्मितीमूल्यांसह मुख्य स्टेजवर नेऊन, सिॲटल बीएमएम समितीने ने एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. सर्व वादक, रसिक आणि बीएमएम नेतृत्व हे आतापासूनच DC बीएमएम २०२८ च्या अधिवेशनात ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्याची आणि फुलण्याची वाट पाहत आहेत! 🙌🔥

-विनय क्षीरसागर (ढोल-ताशा समिती अध्यक्ष)

निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये (ढोल-ताशा समिती उपाध्यक्ष)

🌟 Key Highlights:

50+ Vadaks rocked the main stage with high-power 8-9 minutes performances!

Judged by popular Marathi vocalist & playback singer Hrishikesh Ranade 🎤

Mega Day 2 Jam: All 3 teams joined the host Seattle BMM Dhol Tasha team for a flawless, spontaneous joint performance displaying pure passion, skill and unity!

Renowned theater and screen personality Sri Vijay Kenkare presented trophies and certificates to all teams.

By elevating Dhol Tasha to the main stage with top-tier production setup, Seattle BMM has set a new precedent.