बीएमएम २०२६ – स्त्रीत्वाचा सन्मान
• ती संस्कृतीची वाहक • ती नात्यांची वीण • ती उद्याची दिशा
बीएमएम २०२६च्या केंद्रस्थानी आहे – 'ती' चा सन्मान, स्त्रीत्वाचा गौरव – Celebration of Womanhood.
ती म्हणजे उर्मी, ऊर्जा, प्रीती, महत्वाकांक्षा, जबाबदारी. ती आपली मायभूमी, मायबोली, संस्कृती आणि अस्मिता. ती माता, भगिनी, मुलगी, पत्नी, प्रियसी आणि मैत्रीण.
तीच आपल्याला पहिलं बाळकडू देते. तीच नाती विणायला शिकवते. तीच जगण्याचा अर्थ समजावते आणि आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते.
ती आपली ओळख आहे, तीच आपली शक्ती आहे. संस्कृतीचा आधारस्तंभ, मूल्यांची शिदोरी आणि पुढील पिढीची दिशा हे सर्व तिच्याच हातात असते.
म्हणूनच बीएमएम २०२६ मध्ये आम्ही स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा संकल्प केला आहे.

Initiative
सन्मान उपक्रम
बीएमएम २०२६ हे केवळ साडेतीन दिवसांचे अधिवेशन नाही. हा एक असा प्रवास आहे जो स्थानिक मराठी मंडळांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मराठी समुदायाला एका समान धाग्यात बांधतो.
याच संकल्पनेचा भाग म्हणून, मार्च ते ऑगस्ट २०२६ पासून दर महिन्याला स्त्रीत्वाचा सन्मान करण्यात येत आहे. भारतामधील आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच अमेरिकेतील आपल्या समुदायातील प्रेरणादायी, कर्तृत्ववान महिलांचा विशेष गौरव करून त्यांना अधिवेशनात मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
तिच्या कर्तृत्वाला सलाम...
तिच्या संघर्षाला प्रणाम...
तिच्या स्वप्नांना नवी भरारी...
बीएमएम २०२६ कडून स्त्रीत्वाला मानाचा मुजरा.
Sponsor
विशेष सहकार्य
स्त्रीत्वाचा सन्मान उपक्रमाची संकल्पना राबविताना, निवडल्या जाणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एका यशस्वी महिला उद्योजिकेच्या सहभागाचा विचार करण्यात आला. त्या अनुषंगाने या उपक्रमासाठी कुलस्वामिनी पैठणी आम्हाला प्रायोजक म्हणून लाभले आहेत.
कुलस्वामिनी पैठणीच्या संस्थापिका श्रीमती श्वेता बोबडे यांनी त्यांच्या निवडक आणि उंची संग्रहामधील सुंदर पैठणी साड्या देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे सन्मानित महिलांच्या गौरवात आणखी भर पडणार आहे.

Honourees
सन्मानित मान्यवर
भारतातील सन्मानित मान्यवर स्त्रिया

अश्विनी भिडे
IAS अधिकारी
मुंबई मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या यशस्वी नेतृत्वासाठी प्रसिद्ध.

उषा मंगेशकर
ज्येष्ठ गायिका
भारतीय संगीतविश्वातील सुरेल आणि बहुआयामी गायिका.

रोहिणी हट्टंगडी
ज्येष्ठ अभिनेत्री
रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित अभिनेत्री.
उत्तर अमेरिकेतील सन्मानित मान्यवर स्त्रिया

डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर
संस्कृत साहित्य अभ्यासक
संस्कृत व मराठी साहित्य क्षेत्रातील दीर्घकालीन मोलाच्या योगदानासाठी प्रसिद्ध.

डॉ. शैला कोदे
बालरोगतज्ज्ञ डॉक्टर
बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा व समाजकार्यासाठी प्रसिद्ध.

अंजली अंतुरकर
समाजनेत्या | प्रकाशिका
मराठी समाज, शिक्षण व समाजसेवेतील नेतृत्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध.

डॉ. विद्या जोशी
बीएमएम माजी अध्यक्षा
मराठी शिक्षण, महिला सक्षमीकरण व समाजकार्यासाठी प्रसिद्ध.

डॉ. मीना नेरूरकर
लेखिका, नाटककार व स्त्रीरोगतज्ज्ञ
वैद्यकीय, साहित्य आणि रंगभूमीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व.
-bongale-womenhood.webp)
प्राजक्ता (सारा) बोंगाळे
Clinical Scientist | U.S. Army
अमेरिकन सैन्यदलातील सेवा व प्रेरणादायी कर्तृत्वासाठी प्रसिद्ध.
आणखी सन्मानार्थींची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.