Home/Competitions/Dhol-Tasha

तालश्रेष्ठ वादनोत्सव - BMM2026 ढोल-ताशा स्पर्धा!

Taalshreshtha Vadanotsav – BMM 2026 Dhol-Tasha Competition!

ढोल, ताशा, लेझीम, झांज व ध्वज - म्हणजे हिंदवी स्वराज्य, मराठी पराक्रम, इतिहास, संस्कृती, आणि लोककलेचा अभिमान, सन्मान आणि प्रत्येक मराठी समारंभाची शान!

सिॲटल BMM२०२६ अधिवेशन साजरे करूयात, ढोल ताशाच्या धुमधुमीत, वाजत गाजत, अपार जल्लोषात!

Dhol-Tasha competition preview

Dhol-Tasha Competition

Competition Sections

Taalshreshtha Vadanotsav

🥁 Seattle BMM2026 - तालश्रेष्ठ वादनोत्सव ढोल ताशा स्पर्धा – A Great Success! 🥁

What an incredible celebration of rhythm, energy, and culture! From 6 auditioning teams, 3 finalist pathaks took the massive 60ft main stage during prime hours on day 1, creating pure magical experience with professional AV & lighting:

🏆 Final Winners:

1st
Svarajya Dhol Pathak

Utah

2nd
Phoenix Metro Maharashtra Mandal Dhol Tasha Pathak
3rd
NADTAL

Atlanta

🌟 Key Highlights:

50+ Vadaks rocked the main stage with high-power 8-9 minutes performances!

Judged by popular Marathi vocalist & playback singer Hrishikesh Ranade 🎤

Mega Day 2 Jam: All 3 teams joined the host Seattle BMM Dhol Tasha team for a flawless, spontaneous joint performance displaying pure passion, skill and unity!

Renowned theater and screen personality Sri Vijay Kenkare presented trophies and certificates to all teams.

By elevating Dhol Tasha to the main stage with top-tier production setup, Seattle BMM has set a new precedent.

Event Photo Gallery

स्वराज्य ढोल पथक, युटा — प्रथम क्रमांक

स्वराज्य ढोल पथक, युटा — प्रथम क्रमांक

फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक — द्वितीय क्रमांक

फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक — द्वितीय क्रमांक

नादताल, अटलांटा — तृतीय क्रमांक

नादताल, अटलांटा — तृतीय क्रमांक

परीक्षक हृषिकेश रानडे यांच्या समवेत स्पर्धा आयोजक — अध्यक्ष विनय क्षीरसागर; उपाध्यक्ष निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये

परीक्षक हृषिकेश रानडे यांच्या समवेत स्पर्धा आयोजक — अध्यक्ष विनय क्षीरसागर; उपाध्यक्ष निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये

Marathi Success Story

🥁 तालश्रेष्ठ वादनोत्सव ढोल- ताशा स्पर्धा @ सिॲटल बीएमएम – प्रचंड यशस्वी! 🥁

तालश्रेष्ठ वादनोत्सव म्हणजे ताल, ऊर्जा आणि संस्कृतीचा अद्भुत सोहळा! ऑडिशन दिलेल्या ६ संघांमधून, अंतिम विजेत्या ३ पथकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भव्य ६०-फूट मुख्य रंगमंच गाजवला. उत्कृष्ट प्रोफेशनल रंगमंच, AV आणि लाईटिंगच्या जोरावर एक वेगळीच जादू निर्माण झाली!

🏆 अंतिम निकाल:

प्रथम
स्वराज्य ढोल पथक

युटा

द्वितीय
फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ ढोल ताशा पथक
तृतीय
नादताल

अटलांटा

परीक्षक: प्रसिद्ध मराठी गायक हृषिकेश रानडे

🌟 प्रमुख नोंदी:

६० वादकांनी ८-९ मिनिटांच्या हाय-एनर्जी सादरीकरणाने मुख्य रंगमंच हादरवून सोडला!

दुसऱ्या दिवशीचा मेगा-जॅम: तिन्ही पथकांनी सिॲटल ढोल ताशा पथकासोबत कोणतीही पूर्वतयारी नसताना एका छोट्या सूचनेवर अप्रतिम आणि उत्स्फूर्त 'जॅमिंग' सादर केले. हे ढोल ताशा कौशल्याचे, एकता आणि पराकोटीच्या निष्ठेचे सादरीकरण होते.

प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. विजय केंकरे यांच्या हस्ते सर्व संघांना ट्रॉफी आणि वैयक्तिक प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

ढोल ताशा समितीचा अध्यक्ष म्हणून निरोप घेताना, मी अत्यंत अभिमानाने जाहीर करतो की 'ताल श्रेष्ठ वादनोत्सव' प्रचंड यशस्वी झाला आणि आमच्या स्वप्नाची सुंदर पूर्तता झाली! ढोल ताशा या कलेला अव्वल दर्जाच्या निर्मितीमूल्यांसह मुख्य स्टेजवर नेऊन, सिॲटल बीएमएम समितीने ने एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. सर्व वादक, रसिक आणि बीएमएम नेतृत्व हे आतापासूनच DC बीएमएम २०२८ च्या अधिवेशनात ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्याची आणि फुलण्याची वाट पाहत आहेत! 🙌🔥

-विनय क्षीरसागर (ढोल-ताशा समिती अध्यक्ष)

निखिल देवस्थळी, पराग राजोपाध्ये (ढोल-ताशा समिती उपाध्यक्ष)