घर करा रे प्रसन्न आणि मस्त बिनधास्त चोवीस तास
अधिवेशनात डॉ. संजय उपाध्ये दोन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर करणार आहेत.
🎭 उत्तररंग | ६ ऑगस्ट, २०२६ - मस्त बिनधास्त चोवीस तास - ताणतणाव विसरून आनंदी आणि बिनधास्त आयुष्य जगण्याचा हलकाफुलका प्रवास.
🏡 मुख्य अधिवेशन- घर करा रे प्रसन्न – संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमातून घर अधिक आनंदी व प्रसन्न कसे बनवावे, याचा हृदयस्पर्शी वेध.
विनोद, विचार आणि जीवनानुभवांचा सुंदर संगम असलेले हे दोन्ही कार्यक्रम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.
डॉ. संजय उपाध्ये यांची थोडक्यात ओळख: डॉ. संजय गोविंद उपाध्ये हे लेखक, कवी, जादूगार, वक्ते, विचारवंत आणि शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. सध्या ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे मार्गदर्शक आणि मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, कविता, नाट्य, पटकथा लेखन आणि रंगभूमी या क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी पीएचडीसाठी प्रबंध म्हणून ‘विनायक विजय’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ५००० ओळींचे काव्य चरित्र रचले.. ‘गप्पाष्टक’ आणि ‘मन करा रे प्रसन्न’ हे त्यांचे विशेष गाजलेले कार्यक्रम आहेत. गप्पाष्टक कार्यक्रमाचे १५ देशांमध्ये १,५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
