Home/India Programs/natakamagche-natak

नाटकामागचे नाटक

दिग्गज कलाकार प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या रंगतदार सादरीकरणाने सजलेला हा एक आगळावेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे.

रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रत्येक नाटकामागे अनेक किस्से, आठवणी, गमती-जमती आणि पडद्यामागच्या घडामोडी दडलेल्या असतात. कलाकारांचा प्रवास, तालमींमधील मजेदार प्रसंग, प्रयोगांदरम्यान घडलेल्या रंजक घटना आणि रंगभूमीशी जोडलेल्या अनेक आठवणी या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडल्या जातील.

अशा नाटकामागच्या कथा, धमाल गप्पा, हसवणारे किस्से, छान गाणी आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या खास शैलीतील कविता यांची सुंदर गुंफण असलेला हा कार्यक्रम म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक आनंददायी प्रवास आहे. हा कार्यक्रम रसिकांना हसवत नाटकाच्या पडद्यामागचे विश्व अनुभवायला देतो.

दिनांक: रविवार ९ ऑगस्ट, २०२६

सत्र : सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० ह्या सत्रात

नाटकामागचे नाटक