साधू-संत येती घरा
BMM समाजरंग उपक्रमांतर्गत सादर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात सहभागी होत आहेत -
समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि गरजू घटकांसाठी समर्पित भावनेने कार्य करणारे चार प्रेरणादायी समाजसेवक:
• डॉ. विनोद शहा – जनसेवा फाउंडेशन
रस्त्यावर राहणाऱ्या आणि झोपडपट्टीतील मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य.
• श्री. यजुर्वेंद्र महाजन – दीपस्तंभ फाउंडेशन
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी कार्य.
• डॉ. गिरीश कुलकर्णी – स्नेहालय फाउंडेशन
वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन, शिक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य.
• श्री. अशोक देशमाने – स्नेहवन फाउंडेशन
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी कार्य.
समाजाच्या विविध स्तरांतील उपेक्षित घटकांना आधार, शिक्षण आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या या समाजसेवकांच्या प्रेरणादायी कार्याचा परिचय BMM समाजरंग या उपक्रमातून रसिकांना होणार आहे.
दिनांक: शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६
सत्र: दुपारी १:०० ते संध्याकाळी ६:००
